रेल्वे प्रशासन पुन्हा झोपले का? “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस”ऐवजी “CST” असा उल्लेख…. मराठी अस्मितेचा अपमान!

 रेल्वे प्रशासन पुन्हा झोपले का? “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस”ऐवजी “CST” असा उल्लेख…. मराठी अस्मितेचा अपमान!

मुंबई प्रतिनिधी केतन खेडेकर पनवेलहून
मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये पुन्हा एकदा एक गंभीर आणि अस्वीकार्य बाब समोर आली आहे. गाडीतील डिजिटल इंडिकेटरवर “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)” या अधिकृत नावाऐवजी जुना व अपूर्ण उल्लेख “CST” दाखवला जात आहे.
ही बाब केवळ तांत्रिक चूक नसून, जाणूनबुजून मराठी जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावात “महाराज” हा गौरवसंचक शब्द मुद्दाम वगळणे — हे दुर्लक्ष नव्हे, तर अपमान आहे.

रेल्वे प्रशासन अजूनही याकडे दुर्लक्ष करत आहे. अनेक तक्रारी असूनही गाड्यांच्या डिजिटल बोर्ड, संकेतस्थळे आणि तिकिटांवर चुकीचा उल्लेख कायम आहे. हा निष्काळजीपणा आहे का जाणून केलेले मराठी माणसांचे मन दुखवण्याचा प्रकार आहे. अशा प्रकाराला नक्कीच माफ करता येणार नाही. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील आणि मुंबईतील मराठी माणसांच्या भावना दुखावल्या आहेत

राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने तात्काळ दखल घ्यावी, तसेच सर्व ठिकाणी योग्य आणि संपूर्ण नाव — छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वापरण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व रेल्वे प्रवासी करत आहेत. तसेच ही जाणून-बुजून घोडचूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि रेल्वेच्या प्रशासनावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *