कुणकेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी..!

 कुणकेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी..!

सिंधुदुर्ग, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथे तीन दिवसीय कुणकेश्वर यात्रोत्सव सुरू आहे. दिवसभर भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी सुरू होती.

रात्री ह्या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली . मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने अक्षरशः फुलुन गेला. दरम्यान पोलीस प्रशासनआणि कुणकेश्वर मंदिर ट्रस्टने दर्शन रांगेची चोख व्यवस्था ठेवली आहे . प्रशासनाने नियोजनात काही बदल करून भाविकांना अगदी वेगाने दर्शन रांग सुरू करून ठेवत गर्दीवर नियंत्रण ठेवले .Crowd of devotees for darshan at Kunkeshwar..!

महाशिवरात्री यात्रोत्सवाच्या निमित्ताने शेकडो वर्षे पुरातन कुणकेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आकर्षक रोषणाईने उजळून निघाले आहे .

ML/KA/PGB
19 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *