पावसाने पिके गेली पाण्याखाली…

बुलडाणा, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आठवडाभराच्या विश्रांती नंतर बुलडाणा जिल्ह्यात रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे.. जिल्हाभर हा पाऊस पडत आहे, सकाळी काही वेळ पाऊस थांबला होता मात्र आता परत पाऊस सुरू झाला आहे.
तर रात्रभर पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील खामगाव,संग्रामपूर, जळगाव जामोद या तालुक्यात नुकतीच उगवलेली पिके पाण्याखाली गेली आहेत.. तर काही ठिकाणची शेती देखील खरडून गेल्याची माहिती आहे… जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे रात्रीच्या पावसामुळे अनेक क्षेत्रांमध्ये पाणी तुंबून आहे त्यामुळे शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत.
ML/KA/SL
19 July 2023