युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर, दोन जवानांची रेल्वेतून फेकून केली होती हत्या
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत सोमवारी मृत्यू झाला. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. यूपी एसटीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने एक लाख रुपयांचा पुरस्कार असलेला गुन्हेगार जाहिद उर्फ सोनूला चकमकीत ठार केले आहे. नोएडा युनिट आणि गाझीपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गुन्हेगारावर गोळी झाडण्यात आली, त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जाहिदवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. दिलदारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जमानिया-दिलदारनगर रोडवर ही चकमक झाली. चकमकीत ठार झालेला गुन्हेगार दोन आरपीएफ हवालदारांच्या हत्येप्रकरणी वाँटेड होता.