कर्तव्यावर असणाऱ्या ‘एसीपी’वर विनयभंगाचा गुन्हा
औरंगाबाद दि. 15- : नाईट ड्युटीवर असताना एसीपी पदावरील पोलीस अधिकाऱ्याने रात्री २ वाजेच्या सुमारास घरात घुसून महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल ढुमे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. एका घरात जाऊन महिलेची छेड काढल्याचा तसेच महिलेच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप एसीपी विशाल ढुमे यांच्यावर करण्यात आला आहे. ज्या इमारतीत हा प्रकार घडला तेथील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.
दरम्यान औरंगाबाद गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
ML/KA/SL
15 Jan. 2023