विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, अंतराळात ट्रॉफी लाँच
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहुप्रतीक्षित अशा आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक मुंबईत जाहीर करण्यात आलं. ५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत हे सामने देशातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. बहुचर्चित भारत-पाकिस्तान लढत 15 ऑक्टोबरला अहमदाबाद इथे होणार आहे. राज्यात मुंबई आणि पुणे या स्टेडियमवर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत.भारतात पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या एकदिवसीय विश्वचषकाची ट्रॉफी लाँच करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी ट्रॉफी अंतराळात लॉन्च केली. यासोबतच ट्रॉफीचा जागतिक दौराही जाहीर करण्यात आला. 27 जूनपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टूर अंतर्गत 18 देशांचा प्रवास केल्यानंतर ही ट्रॉफी भारतात परतेल. हा दौरा ४ सप्टेंबरला संपणार आहे.
आयसीसीने अमेरिकेच्या ‘सेंट इनटो स्पेस’ या खासगी अंतराळ संस्थेच्या मदतीने ट्रॉफी अवकाशात पाठवली. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 12,000 फूट उंचीवर पोहोचल्यानंतर स्ट्रॅटोस्फियरमध्ये ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. स्ट्रॅटोस्फियर हा पृथ्वीच्या वातावरणाचा दुसरा थर आहे, जो ट्रोपोस्फियरच्या वर आणि मेसोस्फियरच्या खाली स्थित आहे. 4K कॅमेऱ्यांच्या मदतीने टिपलेले काही आश्चर्यकारक व्हिडिओ शॉट्स ICC ने प्रसिद्ध केले आहेत.
विश्वचषक 2023 संपूर्ण वेळापत्रक
5 ऑक्टोबर- इंग्लंड वि. न्यूझीलंड- अहमदाबाद
6 ऑक्टोबर- पाकिस्तान वि. क्वालिफायर1- हैदराबाद
7 ऑक्टोबर- बांगलादेश वि. अफगाणिस्तान- धरमशाला
7 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका वि. क्वालिफायर 2- दिल्ली
8 ऑक्टोबर- भारत वि. ऑस्ट्रेलिया- चेन्नई
9 ऑक्टोबर- न्यूझीलंड वि. क्वालिफायर1- हैदराबाद
10 ऑक्टोबर- इंग्लंड वि. बांगलादेश- धरमशाला
11 ऑक्टोबर- भारत वि. अफगाणिस्तान- दिल्ली
12 ऑक्टोबर- पाकिस्तान वि. क्वालिफायर2- हैदराबाद
13 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका- लखनौ
14 ऑक्टोबर- इंग्लंड वि. अफगाणिस्तान- दिल्ली
14 ऑक्टोबर- न्यूझीलंड वि. बांगलादेश- चेन्नई
15 ऑक्टोबर- भारत वि. पाकिस्तान- अहमदाबाद
16 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर2- लखनौ
17 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका वि. क्वालिफायर1- धरमशाला
18 ऑक्टोबर- न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान- चेन्नई
19 ऑक्टोबर- भारत वि. बांगलादेश-पुणे
20 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान- बंगळुरू
21 ऑक्टोबर- इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका- मुंबई
21 ऑक्टोबर- क्वालिफायर 1 वि. क्वालिफायर2- लखनौ
22 ऑक्टोबर- भारत वि. न्यूझीलंड-धरमशाला
23 ऑक्टोबर- पाकिस्तान वि. अफगाणिस्तान- चेन्नई
24 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश- मुंबई
25 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर1- दिल्ली
26 ऑक्टोबर- इंग्लंड वि. क्वालिफायर2- बंगळुरू
27 ऑक्टोबर- पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका- चेन्नई
28 ऑक्टोबर- क्वालिफायर1 वि. बांगलादेश- कोलकाता
28 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड- धरमशाला
29 ऑक्टोबर- भारत वि. इंग्लंड- लखनौ
30 ऑक्टोबर- अफगाणिस्तान वि. क्वालिफायर2- पुणे
31 ऑक्टोबर- पाकिस्तान वि. बांगलादेश- कोलकाता
1 नोव्हेंबर- न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका- पुणे
2 नोव्हेंबर- भारत वि. क्वालिफायर2- मुंबई
3 नोव्हेंबर- क्वालिफायर1 वि. अफगाणिस्तान- लखनौ
4 नोव्हेंबर- न्यूझीलंड वि. पाकिस्तान- बंगळुरू
5 नोव्हेंबर- भारत वि. दक्षिण आफ्रिका- कोलकाता
6 नोव्हेंबर- बांगलादेश वि. क्वालिफायर2- दिल्ली
7 नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान- मुंबई
8 नोव्हेंबर- इंग्लंड वि. क्वालिफायर1- पुणे
9 नोव्हेंबर- न्यूझीलंड वि. क्वालिफायर 2- बंगळुरू
10 नोव्हेंबर- दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान- अहमदाबाद
11 नोव्हेंबर- भारत वि. क्वालिफायर 1- बंगळुरू
12 नोव्हेंबर- इंग्लंड वि. पाकिस्तान- कोलकाता
12 नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश- पुणे
15 नोव्हेंबर- सेमी फायनल- मुंबई
16 नोव्हेंबर- सेमी फायनल- कोलकाता
19 नोव्हेंबर- फायनल-अहमदाबाद
SL/KA/SL
27 June 2023