वडाळा येथील क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि ७
वडाळा वेस्ट सिटिझन्स फोरमच्या वतीने सेंट जोसेफ स्कूल, वडाळा येथे नुकतेच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तरुणांसह सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत महिला संघांनी देखील मोठ्या संख्येने उत्कृष्ट कामगिरी करत सहभाग नोंदवला.
आम्ही विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आम्ही विभागातील सर्व तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेमध्ये नागरिकांचा सहभाग, विश्वास आणि सहकार्य हाच आमच्या कार्याला दिशा देणारा आणि बळ देणारा मुख्य आधार आहे. यापुढे देखील आम्ही असेच प्रकारचे विविध क्रीडाविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी दिली.KK/ML/MS