भुईबावडा घाटात दरड कोसळण्यास सुरुवात

 भुईबावडा घाटात दरड कोसळण्यास सुरुवात

सिंधुदुर्ग, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वैभववाडी तालुक्यात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरूवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसाने भुईबावडा घाटात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दगड, गोटे रस्त्यावर आल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान गुरूवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घाटात झालेली पडझड हटवून रस्ता वाहतूकीस पूर्ववत केला आहे.Cracks started to collapse in Bhuibawda Ghat

तालुक्यात गुरूवारी पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर ही पडझड झाली आहे.

ML/KA/PGB
20 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *