पाकीस्तानी सौदर्यप्रसाधने विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई

 पाकीस्तानी सौदर्यप्रसाधने विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई

छ. संभाजीनगर, दि. ३१ : छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकीस्तानी सौंदर्य प्रसाधमांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातल्या विविध ठिकाणी ही विक्री सुरु होती. या अवैध विक्रिची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत चार दुकानांवर धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांनी तीन जणांना अटकही केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांच्या दक्षतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे.

संबंधित आरोपींवर व्यावसाय अधिनियम कलम ३, भारतीय न्याय संहिता कलम २२३ आणि ड्रग्स आणि कॉस्मेटीक अॅक्ट अंतर्गत कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी यासंबंधीची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिस अधिक्षकांना दिल्याची माहितीही समोर आली आहे.

शहारतल्या विविध भागामध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधन साहित्याची खुलेआम विक्री होत असून पोलिस कोणतीही कारवाई करत नाहीत, पोलिसांनी जर कारवाई केली नाही, तर मनसे स्वतः या विक्रेत्यांवर मनसे स्टाईल कारवाई करेन, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानंत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *