पोलादपूर महाबळेश्वर मार्गवर दरड कोसळली.

अलिबाग, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील कुंभळवणे गावाजवळ दरड कोसळली त्यामुळे वाहतूक एकेरी मार्गाने सुरू आहे.
काही काळ विश्रांती घेतल्या नंतर पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानंतर गेल्या २५ तासात पोलादपूर तालुक्यात ४१ मी मी पाऊस पडला आहे शुक्रवारी सकाळी पासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून पोलादपूर महाबळेश्वर राज्य मार्गवर कुंभळवणे गावाच्या जवळ मातीचा ओसरा खाली आल्याची घटना घडली तर पायटा गावाच्या आसपास एक झाड वाकल्याने रस्त्याच्या बाजूला झुकले आहे.
वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानंतर पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलादपूर आपत्ती नियंत्रण कक्षच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम उपविभाग मार्फत जेसीबी पाठवत माती बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. Crack fell on Poladpur Mahabaleshwar Marg.
पोलादपूर तालुक्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडत असल्याने पुन्हा हवेत गारवा निर्माण झाला आहे.
ML/KA/PGB
8 Sep 2023