सीपीएस पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी आझाद मैदानात डॉक्टरांचे आंदोलन

 सीपीएस पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी आझाद मैदानात डॉक्टरांचे आंदोलन

मुंबई, दि ५
देशभरातील शेकडो डॉक्टरांनी CPS पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या दीड वर्षांपासून रखडलेल्या परीक्षेसाठी आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन केले.

MBBS उत्तीर्ण झाल्यानंतर जीवाची पर्वा न करता हजारो कोविड बाधित रुग्णांचे प्राण वाचविल्यानंतर, आम्ही विद्यार्थ्यांनी 2021 NEET PG परीक्षा दिली. भारत सरकारच्या पत्रानुसार संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन (DMER), मुंबई यांनी प्रवेश प्रक्रिया राबवून CPS मुंबई मान्यताप्राप्त संस्थांमध्ये आम्हा विद्यार्थ्यांना विविध कोर्समध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला होता. त्या अनुषंगाने 2022 मध्ये निवड झालेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊन आम्ही विद्यार्थ्यांनी 2024 मध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला.
ऑक्टोबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेत आमच्यासोबत प्रवेश घेतलेल्या साधारणतः निम्म्या डॉक्टरांनी परीक्षा उत्तीर्ण केली असून, त्यांना अतिरिक्त अर्हताधारक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे आणि ते त्यांच्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर म्हणून आरोग्य सेवा बजावत आहेत.
परंतु दुर्दैवाने ऑक्टोबर 2024 मध्ये काही कारणास्तव परीक्षा देऊ न शकलेले किंवा त्या परीक्षेत थोड्या गुणांनी अनुत्तीर्ण झालेले डॉक्टर यांच्यासाठी एप्रिल 2025 मध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
मात्र, परीक्षेच्या 15 दिवस आधी आमच्या ई-मेल आयडीवर परीक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात (Postponed) आली आहे, असा मेल प्राप्त झाला. तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण भारतातील 2285 डॉक्टर त्यात महाराष्ट्रातील साधारणतः 1000 डॉक्टर दीड वर्षांपासून परीक्षेपासून वंचित आहेत.
या संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे अपील दाखल केल्यानंतर, परीक्षेबाबत मा. सर्वोच्च न्यायालय सकारात्मक असूनही सुनावणीदरम्यान विविध कारणांनी वारंवार विलंब होत आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक, मानसिक, शारीरिक व सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, 11 मार्च 2026 रोजी मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे होणाऱ्या सुनावणीच्या वेळी सर्व संबंधितांनी उपस्थित राहून मा. न्यायालयास लवकरात लवकर परीक्षेची तारीख जाहीर करण्याची विनंती करावी, तसेच तात्काळ परीक्षा घेऊन अतिरिक्त अर्हताधारक प्रमाणपत्र प्रदान करावे, अशी मागणी राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उपस्थित शेकडो डॉक्टरांनी केली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *