सी पी राधाकृष्णन यांचे दिल्लीला प्रयाण…

मुंबई दि १८– भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय सी. पी. राधाकृष्णन जी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आज त्यांनी दिल्लीकडे प्रयाण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन आले व विमानतळावर मुख्यमंत्र्यांसोबत सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्रांचे पुस्तक भेट देऊन शुभेच्छांसह निरोप दिला. मुंबईतील गणेशोत्सवासाठी या असे आग्रहाचे आमंत्रणही दिले. ML/ML/MS