अभिनेता श्रेयस तळपदेच्या अटकेला न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती

 अभिनेता श्रेयस तळपदेच्या अटकेला न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती

मुंबई, दि. २१ :
अभिनेता श्रेयस तळपदेला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून त्याला अटक होणार नाही. हरियाणामधील सोनीपत येथील ह्युमन वेल्फेअर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीशी संबंधित फसवणूकीच्या एका मोठ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकने आज श्रेयसला अटकेपासून तात्पुरतं संरक्षण दिलं आहे.

एका मल्टी-लेव्हल मार्केटिंग कंपनीवर लोकांची फसवणूक केल्याचा आणि विश्वासघात केल्याचा आरोप आहे. या एफआयआरमध्ये अभिनेता आणि ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या श्रेयस तळपदेसह आलोक नाथ यांच्यासह एकूण १३ लोकांची नावं आहेत. त्यांच्यावर विश्वासघात, फसवणूक आणि मालमत्तेचं खोटं हस्तांतरण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सोनीपतमध्ये दाखल झालेल्या एका तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आलं होतं.

दरम्यान, श्रेयस तळपदेने त्याच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरबाबत माहिती मिळवण्यासाठी थेट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. आता या फसवणूक प्रकरणात त्याला तात्पुरता दिलासा मिळाला आहे, म्हणजे सध्या त्याला अटक केली जाणार नाही.

जानेवारी २०२५ मध्ये मुरथलचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अजित सिंग यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की, तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या जबाबात श्रेयसचं नावही होतं. “ही तक्रार त्या कंपनीविरोधात आहे, ज्यांनी लोकांना गुंतवणुकीचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. श्रेयस आणि आलोक नाथ यांचा याच्याशी काय संबंध आहे, याचा तपास आम्ही करत आहोत,” असं त्यांनी तेव्हा स्पष्ट केलं होतं.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *