न्यायालयाने फेटाळली केजरीवालांची अंतरिम जामीन वाढवण्याची याचिका

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने तिहार तुरुंगातून काही काळ सुटका मिळालेले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना आता पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. केजरीवाल यांची अंतरिम जामीन 7 दिवसांनी वाढवण्याची विनंती मान्य करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. 2 जून रोजी त्यांना पुन्हा तिहार तुरुंगात जावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- केजरीवाल यांना नियमित जामिनासाठी ट्रायल कोर्टात जाण्याची मुभा दिली आहे, त्यामुळे याचिका स्वीकारली जात नाही. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या कोर्टातून केजरीवाल यांना 10 मे रोजी अंतरिम जामीन मिळाला होता. त्यांना 2 जून रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले.
दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने 28 मे रोजी केजरीवाल यांच्याविरुद्ध ईडीच्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेण्याचा आदेश 4 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. ईडीने 17 मे रोजी राऊज अव्हेन्यू कोर्टात 18 वे पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये केजरीवाल आणि आप यांना आरोपी बनवले होते. आम आदमी पार्टीने सोमवारी असा युक्तिवाद केला होता की त्यांच्या अटकेनंतर केजरीवाल यांचे वजन 7 किलोने कमी झाले आहे आणि त्यांच्या केटोनची पातळी जास्त आहे, जे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
AAP ने असेही म्हटले होते की डॉक्टरांनी केजरीवाल यांना पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी आणि कॉम्प्युटेड टोमोग्राफी (पीईटी-सीटी) स्कॅन आणि इतर काही वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला दिला होता, ज्यामुळे त्यांनी अंतरिम जामीन वाढवण्याची मागणी केली आहे. तुरुंगात असताना त्यांची साखरेची पातळीही कायम चर्चेचा विषय राहिली. केजरीवाल आणि त्यांच्या पक्षानेही त्यांना इन्सुलिन दिले जात नसल्याचा दावा केला होता.
SL/ML/SL
29 May 2024