ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात पूजा करण्यास न्यायालयाकडून परवानगी

 ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात पूजा करण्यास न्यायालयाकडून परवानगी

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदूचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणात मोठ निर्णय समोर आला आहे. ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे. ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात आता हिंदू भाविक पूजा करु शकतात. वाराणसीमधील न्यायालयानं याबाबत निर्णय दिला आहे. आजच्या निर्णयामुळं ज्ञानवापी मशिदीत पूजा करण्यासाठी जाण्यासाठी हिंदू पक्षकारांना परवानगी मिळाली आहे. ज्ञानवापी मशिदीत दोन तळघरं असून त्यातील दुसऱ्या तळघराचा ताबा मुस्लीम पक्षकारांकडे आहे. आजचा निर्णय हिंदू पक्षकारांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरणात सुप्रीम कोर्टात देखील सुनावणी सुरु आहे.

हिंदू पक्षकारांनी व्यास तळघरात १९९१ पर्यंत पूजा होत असल्याचा दावा होता. न्यायालयानं काल व्यास तळघर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवलं होतं. ७ दिवसात पूज करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुस्लीम पक्षकारांकडून या निर्णयाला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. वाराणसी जिल्हा न्यायालयानं व्यास तळघर जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलं होतं. आता व्यास तळघरात पूजा करण्याची व्यवस्था येत्या ७ दिवसात करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात सोमनाथ व्यास यांच्या कुटुंबीयांकडून १९९३ पर्यंत पूजा करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात आता वाराणसी कोर्टानं हिंदू पक्षकारांना पूजा करण्यास परवानगी दिली आहे.१९९३ पासून ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरातील पूजा बंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा तळघरातील पूजा सुरु करण्यास जिल्हा न्यायालयानं परवानगी दिली आहे.

हिंदू पक्षकारांच्या वकिलांनी ज्ञानवापी प्रकरणात हा पहिला विजय असल्याचं म्हटलं आहे. १९८६ च्या निकालाप्रमाण हा निकाल असल्याचं विष्णू जैन म्हटले आहेत. आता मुस्लीम पक्षकारांकडून या निर्णयाला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे. ज्ञानवापी मशिदीचं गेल्या वर्षी भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आलं होतं.

SL/KA/SL

31 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *