१२ वर्षांच्या मुलाची कहाणी ऐकून न्यायालयाने फिरवला निर्णय

नवी दिल्ली,दि. १७ : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आई-वडीलांच्या भांडणांमुळे मानसिक आणि भावनिकदृष्टीने खचलेल्या १२ वर्षाच्या मुलाची हृदयद्रावक कहाणी ऐकली आणि खंडपीठाने या मुलाची कस्टडी त्याच्या आईकडे दिली आहे. हा निर्णय देताना न्यायाधीशांनी आपलाच निकाल बदलल्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. कोर्टाने स्वत:च दहा महिन्यांपूर्वी दिलेला आदेश बदलून या मुलाची कस्टडी पुन्हा त्याच्या आईकडे देण्याचा निर्णय घेतला. या मुलाची कस्टडी त्याच्या पित्याकडे देऊन आपली चुक झाल्याची कबुलीही सुप्रीम कोर्टाने दिली आहे.
हा मुलगा कोर्टाच्या आदेशामुळे आता वेल्लोरच्या ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजच्या मानसविकार विभागात उपचार घेत आहे. आपल्या चुकीची जाणीव झाल्याने कोर्टाने म्हटले की आता तो त्याच्या आईकडे राहील. जरी त्याच्या आईने आता दुसर लग्न केले असले तरीही. अर्थात त्याच्या पित्याला त्याला भेटता येईल असेही निकाल कोर्टाने म्हटले आहे. या मुलाचे प्रकरण अशा किचकट आणि भावनात्मक प्रकरणात न्यायिक कारवाईतील उणीवा दाखवत आहे. ज्याचा निकाल कोर्टात आई-वडिलांच्या वकीलांच्या युक्तीवादानंतर दिला जातो. मुलाशी बोलल्याशिवाय किंवा त्याच्या बायोलॉजिकल आई-वडिलांशी त्याचे नाते कशाप्रकारचे आहे हे न जाणता असा निकाल दिला होता.
SL/ML/SL