पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी शाहरुख, अक्षय,अजयला न्यायालयाची नोटीस

अलाहाबाद, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
पान मसाल्याची जाहिरात केल्याबद्दल शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना सोशल मिडियावर सातत्याने ट्रोल करण्यात येत आहेत. आता या तीन लोकप्रिय अभिनेत्यांना ही जाहिरात केल्या प्रकरणी न्यायालयाने नोटीस बजावली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना पान मसाल्याच्या जाहिरातीबद्दल नोटीस बजावली आहे. या तिघांविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.
याला उत्तर देताना, डेप्युटी सॉलिसिटर जनरल म्हणतात की या प्रकरणी 20 ऑक्टोबर रोजी या तिन्ही कलाकारांना आधीच नोटीस बजावण्यात आली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही सुरू आहे. याचिकाकर्ते अधिवक्ता मोतीलाल यादव यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, पद्म पुरस्कार मिळालेल्या अभिनेत्यांनी गुटखा आणि पान मसाला जाहिरात करणे अत्यंत चिंताजनक आहे.
हे पदार्थ लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहेत, मग असे बडे सेलिब्रिटी अशा पदार्थांची जाहिरात कशी करू शकतात. याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, तर कारणे दाखवा नोटीस यापूर्वीच देण्यात आली असल्याचे याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले.
ही याचिका लक्षात घेऊन ऑगस्ट 2023 मध्ये न्यायालयाने कॅबिनेट सचिव, मुख्य आयुक्त आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांना नोटीस बजावली होती. याचिकेत सप्टेंबर 2022 च्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल अवमानाची कारवाई करण्याची मागणी केली होती.
याला उत्तर देताना डेप्युटी सॉलिसिटर जनरल एस.बी. पांडे म्हणतात की या प्रकरणी तिन्ही कलाकारांना कारणे दाखवा नोटीस आधीच देण्यात आली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने ते उच्च न्यायालयाने रद्द करावे. न्यायालयाने पुढील कारवाईसाठी 9 मे 2024 ही तारीख निश्चित केली आहे.
SL/KA/SL
11 Dec. 2023