योगी आदित्यनाथांवरील चित्रपटाबाबत न्यायालयाकडून सेन्सॉर बोर्डाला नोटीस

 योगी आदित्यनाथांवरील चित्रपटाबाबत न्यायालयाकडून सेन्सॉर बोर्डाला नोटीस

मुंबई, दि. १५ : ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी’ हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सध्या चर्चेत आहे. अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट योगी आदित्यनाथ यांचा एका साध्या कुटुंबातून मोठा नेता बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवतो. चित्रपटात अभिनेता अनंत जोशी योगी आदित्यनाथ यांची भूमिका साकारत आहे. टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल खूप उत्साह आहे. आता या चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ‘मुंबई उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला नोटीस पाठवली आहे. या चित्रपटाला मान्यता मिळण्यात होणारा विलंब हा मनमानी असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

बार अँड बेंचने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी’ सिनेमाबाबत अपडेट दिली आहे. ‘मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटाला मान्यता मिळण्यात मनमानी करत विलंब केल्यामुळे सेन्सॉर बोर्डाला नोटीस बजावली आहे. हा चित्रपट सिनेमा द माँक हू बिकम चीफ मिनिस्टर या पुस्तकावर आधारित आहे’ या आशयाची पोस्ट करण्यात आली आहे.

‘मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी गंभीर दखल घेत सीबीएफसीला नोटीस बजावली आहे. ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी’ हा चित्रपट योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित असल्याने तो राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील मानला जात आहे. शंतनू गुप्ता यांनी लिहिलेल्या ‘द माँक हू बिकम चीफ मिनिस्टर’ या पुस्तकापासून प्रेरित असलेला हा चित्रपट त्यांच्या संन्यासापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासाला चित्रित करतो.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *