श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात शाही ईदगाहच्या ASI सर्वेक्षणाला न्यायालयाची मंजुरी

अलाहाबाद, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणातील अलाहाबाद हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने शाही ईदगाह मशिदीच्या एएसआय सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह मशिदीच्या प्रकरणात वादग्रस्त जागेसंदर्भातील सर्वेक्षण वकील आयुक्तांमार्फत करण्याची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. न्यायाधीश मयंक कुमार जैन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
यावर १८ डिसेंबरला कोर्ट आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करावी आणि पढील कारवाई कशी असेल यासंदर्भात न्यायालय निर्णय घेणार आहे. सर्व प्रथम हिंदू पक्षाने ही मागणी मथुरा न्यायालयात मांडली होती.
डिसेंबर २०२२ मध्ये मथुरा न्यायालयाने सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती. मात्र मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे सर्वेक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता उच्च न्यायालयाने सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. मुस्लिम पक्ष आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
काशी आणि मथुरा यांच्यातील वादही काहीसा अयोध्येसारखाच आहे. औरंगजेबाने काशी आणि मथुरेतील मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्याचा हिंदूंचा दावा आहे. मथुरेतील हा वाद एकूण 13.37 एकर जमिनीवरील मालकी हक्काशी संबंधित आहे. वास्तविक, श्री कृष्ण जन्मस्थानकडे 10.9 एकर जमिनीचा मालकी हक्क आहे तर शाही इदगाह मशिदीकडे अडीच एकर जमिनीचा मालकी हक्क आहे.
हिंदू बाजूने शाही इदगाह मशिदीचे वर्णन बेकायदेशीर अतिक्रमणांनी बांधलेली रचना आहे आणि या जमिनीवर दावाही केला आहे. शाही ईदगाह मशीद हटवून ही जमीन श्रीकृष्णाच्या जन्मभूमीला द्यावी, अशी मागणी हिंदूंकडून होत आहे. आता उच्च न्यायालयाने सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे, त्यामुळे या प्रकरणातील सत्यता समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
SL/KA/SL
14 Dec. 2023