युद्धजन्य स्थितीमुळे उद्या देशव्यापी मॉकड्रील

नवी दिल्ली, दि. ६ : केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना उद्या ( 7 मे ) रोजी मॉक ड्रिल (Mock Drill) घेण्याचे आदेश दिले आहेत. पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याने युद्धजन्य स्थितीनिर्माण झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची चाचणी घेण्यासाठी हा मॉक ड्रिल घेतला जाणार आहे.
राज्यांनी पोलिस, नागरी संरक्षण यंत्रणा, आरोग्य विभाग आणि अन्य आपत्कालीन सेवांशी संबंधित यंत्रणांना तत्पर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ही मॉक ड्रिल पूर्णतः सरावासाठी असून प्रत्यक्ष धोका नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. युद्धजन्य परिस्थितीत काय करावं याची जाणीव नागरिकांना करून देणं हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
असे असेल मॉक ड्रील
ठिकठिकाणी सायरन वाजवले जातील, जेणेकरून लोकांनी सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा सराव करता येईल.
युद्धस्थितीत नागरिकांना कसे हलवायचे यासाठी सामूहिक स्थलांतराच्या प्रक्रिया दाखवली जाईल.
रात्रीच्या वेळी प्रकाश बंद ठेवण्याचा सराव करून शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून संरक्षण केले जाईल.
सामान्य नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
वैद्यकीय आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा तपासण्यासाठी रुग्णालयांमध्ये विशेष मोहिमा राबवल्या जातील.
महत्त्वाच्या इमारती आणि ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी लपवणे आणि कॅमॉफ्लाज उपाययोजना करण्यात येणार आहेत.
पोलीस, सैन्य आणि नागरी प्रशासन समन्वय साधून युद्धस्थिती व्यवस्थापनाचा सराव करणार आहेत.
नागरिकांसाठी महत्त्वाचे
- ड्रिलच्या वेळी निर्देशांचे पालन करा.
- सुरक्षिततेच्या सूचना आणि आपत्कालीन मार्गांचा अभ्यास करा.
- घरातील प्रकाश आणि इतर विद्युत उपकरणे ठराविक वेळेस बंद ठेवा.
- आपत्ती व्यवस्थापन किट तयार ठेवा (प्राथमिक औषधे, खाद्यपदार्थ, पाणी, टॉर्च इ.).
- ड्रिलमध्ये सक्रिय सहभाग घ्या, जेणेकरून वास्तव परिस्थितीत त्याचा उपयोग होईल.
IndiaMockDrill2025 #CivilDefenseDrill #WarPreparedness #EmergencyResponse #AirRaidSafety #BlackoutDrill #DisasterManagement #SafetyFirst #IndiaSecurity #NationalDrill #DefensePreparedness #StayAlertStaySafe #MockDrillMay7 #WarPrevention #CrisisManagement #IndiaSafetyDrive