“वंदे भारत’ एक्सप्रेस खरेदी करण्यासाठी जगभरातील देश उत्सुक
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर सुरु झालेल्या ३४ वंदे भारत एक्सप्रेसनी देशवासियांना सुखद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव दिला आहे. अल्पावधितच लोकप्रिय ठरलेल्या या एक्सप्रेसच्या जलग प्रवासामुळे अनेक विमान प्रवासी वंदे भारतकडे वळाले आहेत. स्लीपर वंदे भारतचे काम पण अंतिम टप्प्यात आले आहे. देशात पण अनेक राज्यांनी या ट्रेनची संख्या वाढविण्यावर आणि अंतरराज्यीय वंदेभारत सुरु करण्याची मागणी केली आहे.पूर्णपणे भारतात तयार झालेल्या या ट्रेन्सना आता परदेशांतूनही मागणी येऊ लागली आहे. काही देशांनी यासंबंधीची मागणी केली आहे.
बिझनेसलाईनने याविषयीचे एक वृत्त दिले आहे. त्यानुसार दक्षिण अमेरिकेतील देश चिलीने वंदे भारतच्या डिझाईनमध्ये रुची दाखवली आहे. अर्थात चिलीशी प्राथमिक अवस्थेत चर्चा सुरु आहे. लवकरच या देशातून ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. केवळ चिलीची नाही तर परदेशातील अनेक देश या स्वदेशी स्वॅगवर फिदा आहेत. हे डिझाईन त्यांना आवडले आहे. आफ्रिका, लॅटिन अमेरिकावर भारताने लक्ष केंद्रित केले आहे. अनेक देशांनी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हची मागणी नोंदवली आहे. सध्या वंदे भारत ब्रॉड गेजवर धावत आहे. पण स्टँडर्ड गेजसाठी यामध्ये बदल करण्यात येणार आहे. जगातील अनेक देशांमध्ये स्टँडर्ड गेजचा वापर होतो.
रेल्वेची निर्यात कंपनी राईट्सकडे सध्या 2,100 कोटी रुपयांची ऑर्डर आहे. श्रीलंकेने 1,400 कोटी रुपयांच्या रोलिंग स्टॉकची ऑर्डर दिली. तर आफ्रिकीतील देश मोझाम्बिकने 700 कोटी रुपयांची ऑर्डर दिली आहे. श्रीलंकेने 8 सेट डीएमयू, 10 ब्रॉड गेज लोकोमोटिव्ह आणि 160 कोचची ऑर्डर पुरवण्यात येणार आहे. राईट्सने बांगलादेश रेल्वेसाठी कोच पुरविण्याचे कंत्राट मिळवले आहे. ही 1000 कोटी रुपयांची ऑर्डर आहे. भारतीय रेल्वे काही वर्षात फोर्ज्ड व्हील निर्यात करण्याची तयारी करत आहे.
SL/KA/SL
2 Dec. 2023