कॉटन ग्रीन येथील प्राचीन राम मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

 कॉटन ग्रीन येथील प्राचीन राम मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

मुंबई, दि २६
कॉटन ग्रीन येथील प्राचीन कालीन राम मंदिरात रामनवमीच्या पावन उत्सवानिमित्त भाविकांनी प्रचंड गर्दी करून श्रीरामाचे दर्शन घेतले. हे मंदिर 1935 साली स्थापन झाले असून या मंदिराला मोठा इतिहास आहे. या मंदिराला इच्छापूर्ती राम मंदिर असे संबोधले जाते. या मंदिरामध्ये केलेला नवस पूर्ण होतो अशी येथील मंदिराची आख्यायिका आहे. हे मंदिर संपूर्णपणे एका मार्बल दगडात बनवले असून या मंदिरामध्ये राम, लक्ष्मण, सीता , हनुमान आणि गणेशाची मूर्ती एका मोठ्या भव्य मार्बलच्या दगडामध्ये कोरलेली आहे. या मंदिरात दर पंधरा दिवसांनी श्रीरामाला दूध , मध आणि दह्याने अभिषेक केला जातो. या राम मंदिराची सेवा शर्मा कुटुंबीय जिथ पासून मंदिर स्थापन झाल्या तिथ पासून त्यांची पिढी आणि त्यांचे कुटुंबीय करत आहे. या मंदिराचे निर्माण 1935 साली सुरजमल निमानी या मोठ्या व्यापाऱ्याने केले. तेव्हा त्यांनी एक मंदिर या ठिकाणी कॉटन ग्रीन येथे आणि दुसरे मंदिर राजस्थान या ठिकाणी उभारले.
मी गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिरात येत आहे. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की या मंदिरात केलेला नवस शंभर टक्के पूर्ण होतो. त्यामुळे भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी रामनवमीच्या दिवशी दर्शनाला येतात अशी माहिती रामभक्त दीपक करमळकर यांनी दिली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *