कॉटन ग्रीन येथील सर्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तांच्या गर्दी
मुंबई, दि १५
कॉटन ग्रीन रेल्वे स्थानका बाहेर येईल सर्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तांची गर्दी लोटली होती. या सर्वेश्वर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. या मंदिरामध्ये महादेवाचे जुनि पिंड असून या ठिकाणी महादेवाला मोराच्या पिसाने सजवण्यात आले होते. या मंदिरामध्ये शंकर महाराजांची सफेद मार्बल मधली मूर्ती असून या मूर्तीला देखील शंकराचे रूप देण्यात आले होते. या मूर्तीतील शंकर महाराजांना जटा धारण करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे वाघाचे कातडी असलेलं मखमली शाल परिधान करण्यात आली होती.
तर गळ्यामध्ये नाग धारण करण्यात आला असून त्रिशूल, डमरू, रुद्राक्ष माला देखील धरण करण्यात आले होते. हे शंकराचे स्वरूप पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकच गर्दी केली होती. तसेच मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भजन, कीर्तन आणि भंडारा देखील ठेवण्यात आला होता.KK/ML/MS