कॉटन ग्रीन स्टेशनबाहेर पसरले कचऱ्याचे साम्राज्य, प्रवासी हैराण

मुंबई, दि २५
हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक हे महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. परंतु रेल्वे स्थानकावर चढताना फलाट क्रमांक एक च्या बाहेर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.या परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असल्याने रेल्वे प्रवाशी हैराण झाले असून हा कचरा त्वरित उचलावा अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.

कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन हे हरबर मार्गावरील प्रमुख रेल्वे स्टेशन असून या स्टेशन वरून रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात परंतु सध्या या ठिकाणावरून कचऱ्यामुळे पुलावर चढणे फार त्रास दायक झाले शिवाय दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात झाल्याने हा कचरा त्वरित उचलावा अशी माहिती रेल्वे प्रवासी श्रीनिवास देवरुखकर यांनी केली आहे.
कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक पादचारी पुलाजवळ कचरा असल्याची तक्रार आमच्याकडे आली असून त्यानुसार आम्ही हा कचरा उचलण्याबाबत प्रशासनाला कळविले असून लवकच हा कचरा उचलण्यात येईल अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली.KK/ML/MS