सीसीआयकडून कापसाला मिळतोय 7 हजार 400 रुपयांचा दर…
जालना, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): जालन्यात सीसीआय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या कापसाला 7 हजार 400 रुपयांचा दर मिळतोय. नाफेड खरेदी केंद्रावर दररोज सरासरी 1000 ते 1200 क्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. सीसीआयकडून कापसाला आज कमाल 7421 रुपये तर किमान 7124 रुपयांचा दर दिला जात आहे. सीसीआय केंद्रावर कापसाला सरासरी मिळणारा दर 7 हजार 384 इतका आहे. सीसीआय केंद्रावर कापसाची आवक कमी दिसत असून शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना कापूस विक्रीस प्राधान्य देत आहेत. खाजगी व्यापाऱ्यांकडून लगेचच पैसे मिळत असल्याने अडचणीत असलेले शेतकरी गावातच आपला कापूस विक्री करत आहेत.