पेरणीयोग्य पाऊस झाल्याने कपाशीच्या लागवडीस सुरुवात

वाशिम, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीमच्या उंबर्डा बाजार परिसरात झालेल्या पावसामुळे कपाशीच्या लागवडीला सुरुवात झाली असून यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्यानं कपाशीच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतले जाते. मात्र मागील वर्षी पाऊस उशिरा आल्यान कपाशीचे क्षेत्र घटले होते. यावर्षी मात्र वाढ होणार आहे. दरम्यान ग्रामीण भागात रोजगार मिळत नसल्याने शहराकडे गेलेले मजूर शेतीची कामं सुरू झाल्याने गावाकडे परतले असून कपाशी लागवडीसाठी त्यांचा वापर केला जातोय.
ML/ML/SL
16 June 2024