श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात ८.४३ कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल

 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात ८.४३ कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल

धाराशिव, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात ८.४३ कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी राज्य गुन्हे विभागाच्या अहवालानुसार तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिले आहेत. हा घोटाळा १९९१ ते २००९ या कालावधीत झाला होता. न्यायालयाच्या आदेशामुळे आता संबंधित विश्वस्तांवर गुन्हा दाखल होऊन कारवाईच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीने ज्येष्ठ विधिज्ञ संजीव देशपांडे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सहधर्मादाय आयुक्तांनी २०१० मध्ये काही आदेश काढले होते. त्यात दानपेटीचा लिलाव पद्धत बंद करण्याचेही निर्देश दिले होते. त्यानंतर २०१५ मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यावरील सुनावणीवेळी या प्रकरणाची सरकारने वरिष्ठ राज्य गुन्हे विभाग अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, असे खंडपीठाने सांगितले होते.

चौकशीनंतर राज्य गुन्हे विभागाने २७ ऑक्टोवर २०१७ रोजी शासनाला ८.४३ कोटींच्या भ्रष्टाचाराचा अहवाल पाठवला. हा अहवाल सांख्यिकी व लेखापरिक्षणाच्या आधारे असल्याचे नमूद केले होते. अधिवेशन काळात या प्रकरणाचा मुद्दा विधिमंडळातही उपस्थित करण्यात आला होता. २०१७च्या जनहित याचिकेच्या सुनावणीवर खंडपीठाने तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हे दाखल करावेत आणि अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत करावा तपास, असे आदेशही दिले. त्यामुळे आता तुळजाभवानी देवस्थान ट्रस्टच्या तत्कालीन विश्वासांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

SL/ML/SL

10 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *