विमानतळांवरील कोरोना चाचणी बंद

 विमानतळांवरील कोरोना चाचणी बंद

नवी दिल्ली,दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय विमानतळांवर अद्याप पर्यंत कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याचे फॉर्म अपलोड करावे लागत होते. मात्र कालपासून ही प्रक्रिया बंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवासा दरम्यान करावी लागणारी कोविड चाचणी, एअर सुविधा पोर्टलवर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरणे आणि तो अपलोड करणे ही प्रक्रिया बंद करण्यात आली आहे, त्यामुळे प्रवासातील तांत्रिक प्रक्रिया कमी झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

ही चाचणी कोणासाठी बंधनकारक होती

कोविड काळात आतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी एअर सुविधा या पोर्टलची सुविधा सुरू केली होती. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर ती बंद करण्यात आली होती. चीनमधील वाढत्या कोविंड प्रकरणांची दखल घेत भारत सरकारकडून खबरदारी म्हणून ही सुविधा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सुरू करण्यात आली होती. ती आता पूर्णतः बंद करण्यात आली आहे

केंद्रीय मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत सरकारने चीन, सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया, थायलंड आणि जपान येथून किंवा या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड-19 चाचणी आणि एअर सुविधा फॉर्म अपलोड करणे बंद करण्यात येत आहे.”

SL/KA/SL

10 Feb. 2023

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *