या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीन आणि आसपासच्या देशांमध्ये उद्भवलेल्या कोरोनाच्या साथीपासून आपल्या देशवासियांना दूर ठेवण्यासाठी भारत सरकार आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सज्ज झाले आहे. परदेशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांद्वारे कोरोनाच्या प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन आंतराष्ट्रीय पर्यटकांना भारतात प्रवेश करताना कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे.
पार्श्वभूमीवर १ जानेवारीपासून चीन, हाँगकाँग, जपान, द.कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना निगेटीव्ह रिपोर्टची सक्ती केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
प्रवाशांना विमान पकडण्याआधी प्रवासी पोर्टलवर आरटीपीसीआर टेस्टचा निगेटीव्ह रिपोर्ट अपलोड करावा लागेल. प्रवाशाला ७२ तासांमध्ये कोविड चाचणी करावी लागेल. परदेशांतून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी विमानतळावर रँडम टेस्टिंग आवश्यक करण्यात आली आहे.
SL/KA/SL
30 Dec. 2022