सहकारी संस्था पुनर्निर्माण, दरेकरांनी घेतली बैठक…
छ संभाजीनगर दि १९– राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाची बैठक आज सोमवार दिनांक १९ मे २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, संभाजीनगर येथे पार पडली.
या बैठकीस छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड-वाघाळा, जालना, हिंगोली या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, महानगरपालिका, नगरपालिकांचे अधिकारी, नगरविकास, महसूल, सहकार-पणन, गृहनिर्माण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.