सफाई कामगारांना लवकरच सोयी सुविधा

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महानगरपालिका आणि नगरपालिकांसह सर्व शासकीय आस्थापनांमधील सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारसी लागू होतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं.
मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाची आश्रय योजना प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात भाजपाचे भाई गिरकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उपमुख्यमंत्री उत्तर देत होते.सुधारित शासन निर्णयानुसार सर्व शासकीय आस्थापनांना याबाबत सूचना देण्यात येतील असं फडणवीस यांनी सांगितलं .Convenience facilities for sweepers soon
ML/KA/PGB
8 Mar. 2023