इटलीच्या महिला पंतप्रधानांना ‘मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर झाल्याने वादंग
रोम, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही दशकांपूर्वी कणखर नेतृत्वगुण सिद्ध केलेल्या महिलेला कणखर पुरुषाची उपमा दिली जातं. असे कारण समर्थपणे नेतृत्त्व करणे हा केवळ पुरुषांमध्ये असलेला गुण मानला जायचा. आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे वर्णन कॅबिनेटमधील एकमेव पुरुष असे केले जायचे. अर्थात या वर्णनातून त्यांच्या कणखर व्यक्तीमत्त्वाचा आणि नेतृत्वगुणांचा गौरव केला जात असे. बदलत्या काळात कर्तृत्ववान स्त्रीला पुरुषाची उपमा देणे हे अपमानास्पद मानले जाते. असाच प्रकार इटलीच्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या बाबत घडला आहे. त्यांना इटलीच्या Libero Quotidiano वृत्तपत्राने मॅन ऑफ द इयर घोषित केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
महिलांच्या अधिकारांसाठी लढणारे कार्यकर्ते आणि अनेक महिला राजकीय नेत्यांनी हा पुरस्कार लिंगभेद करणारा आणि पुरुषसत्ताक मानसिकता दाखवणारा असल्याचं म्हटलं आहे.महिला खासदार अलेन्झा वर्दी ई सिनिस्ट्रा यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, मेलोनी यांनी ही पदवी नाकारायला हवी. मेलोनी यांना दिलेला पुरस्कार हा पुरुष श्रेष्ठत्व दाखवणारा आहे. पंतप्रधान मेलोनी यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं. तुम्ही महिला आहात, पुरुष आहात की इतर गटातील आहात.
पत्रकार मारिओ सेची यांनी वृत्तपत्रात लिहिलंय की, जगभरातील युद्धामध्ये मेलोनी यांनी लिंग भेदाची लढाई जिंकली आहे. त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या आहेत. त्या दोन्ही युद्धांना सामोऱ्या गेल्या आहेत. राजकीय धक्के सहन केले आहेत. तसेच यूरोप आणि जगाच्या दृष्टीकोनात त्यांनी बदल घडवला आहे.दरम्यान, जॉर्जिय मेलोनी या २०२२ मध्ये इटलीत मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवत पंतप्रधान झाल्या. त्या मुसोलिनी यांच्या समर्थक मानल्या जातात. काही महिन्यांपूर्वी त्या चर्चेत आल्या जेव्हा त्यांनी आपल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. त्यांच्या पतीने एका कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या पतीसोबत १० वर्षांचे नाते तोडण्याचा निर्णय घेतला होता.
SL/KA/SL
31 Dec. 2023