महाराणी ताराबाईंबद्दल जैन मुनींचे वादग्रस्त व्यक्तव्य

 महाराणी ताराबाईंबद्दल जैन मुनींचे वादग्रस्त व्यक्तव्य

मुंबई, दि. 31 : महाराणी ताराराणी या जैन समुदायच्या होत्या, असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील जैन समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की, मोहम्मद घोरीने देशावर आक्रमण केलं त्यावेळी जैन असलेल्या मेवाड राणीने आपली तलवार काढली. त्यानंतर पुढील अनेक वर्षे आपल्या देशावर कोणी नजर वर करून बघायची हिंमत केली नाही. संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणे याला धर्म म्हणतात. विक्रमादित्यने पूर्ण भारताला स्वतंत्र करण्यात मदत केली औरंगजेब याने संभाजी महाराजांना पकडून हाल केले. त्यावेळी आणखी एक जैन महाराणीचा जन्म झाला आणि ती म्हणजे ताराराणी.

आचार्य नयन पद्मसागर यांनी आपल्या भाषणात इतिहासातील विविध दाखले दिले. ते म्हणाले की, “मोहम्मद घोरीने जेव्हा भारतावर आक्रमण केले, तेव्हा मेवाडच्या एका जैन राणीने शस्त्र उपसले होते. त्यानंतर अनेक वर्षे कोणाचीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही. संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात शस्त्र धरणे, हाच खरा धर्म आहे.” याच ओघात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा उल्लेख केला आणि औरंगजेबाचा नाश करण्यासाठी आणखी एका ‘जैन महाराणी’चा म्हणजेच ताराराणींचा जन्म झाला, असे विधान केले.

महाराणी ताराराणी यांचा इतिहास बदनाम करणाऱ्यांच्या षड्यंत्रात या जैन मुनींनी सहभागी होऊ नये. जैन समाज हा शांतता प्रिय समाज आहे, त्यामुळे महापुरुषांच्या नावावरून त्यांनी वाद निर्माण करू नयेत. महाराणी ताराराणी यांच्या खरा इतिहास समोर आल्यानंतर त्यांच्या पराक्रमाला समांतर कोणीही नाही हे स्पष्ट आहे. त्यांच्याबाबत नव्याने सुरू झालेली ही चर्चा त्यांच्या पराक्रमामध्ये बाधा आणणारी आहे, असेही इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत म्हणाले.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *