कंत्राटी आरोग्य सेविकेचे धरणे आंदोलन
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय आरोग्य अभियान (एचएनएम) अंतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका (आरबीएसके) शहरी व ग्रामीण एएनएम, जीएनएम , एलएचव्ही यांना रिक्त पदावर सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी
मंत्रालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत.
15 वर्षापासुन अतिशय तुटपुंज्या मानधनावर खेडोपाडी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका साहय्यीका व शहरी भागात आपल्या जिवाची बाजी लावत आरोग्य सेवा देत आहे.
नुकत्याच कोरोना महामारित आपल्या कुटुंबाची परवा न करता कोविड महामारीवर मात करण्यासाठी रात्रदिवस आरोग्य सेवा दिलेली आहे. राज्य सरकार कंत्राटी आरोग्य सेविकेला व आरोग्य साहय्यीकेला शासन सेवेत नियमीत करित नाही. मात्र इतर विभागातील रोजंदारी, व तासिका कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेतले जात आहे. या करिता आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्या वतीने हे धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने आरोग्य विभागातील क व ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याची मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र राज्यात नियमीत एएनएम, जिएनएम यांचे मोठे रिक्तपदे आहेत. या ठिकाणी 10 ते 15 वर्ष कंत्राटी आरोग्य सेविका व साहय्यीका काम करित आहे. कामाचा अनुभव असलेल्या, शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व आपले तारुण्य शासन सेवेत दिलेल्या त्या कंत्राटी एएनएम, जिएनएम यांची वयाची अट शिथील करून रिक्त पदावर शासन सेवेत सामावून घेण्यात यावे. तसेच सामावून घेतल्या नंतर उर्वरीत रिक्त पदावर जाहिरातीव्दारे पदभरतीची कार्यवाही करण्यात यावी. जोपर्यंत शासन सेवेत सामावून नाही. तो पर्यंत समान कामाला समान वेतन देण्यात यावे.अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.Contractual health workers protest
ML/KA/PGB
13 Mar. 2023