16जून रोजी कंत्राटी नर्सेस करणार लक्षवेध आंदोलन

मुंबई प्रतिनिधी
आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन च्या वतीने दिनांक 16 जून 2025 रोजी मुंबई येथे आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेला आहे
आपल्या व्यथा मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट पाहिजे बरेच पत्र दिले भेट काही मिळत नाही सगळ्यांना कल्पना आहे . यांना एऋ भरपूर काम आहे फक्त दहा मिनिटं भेटून कंत्राटी नर्सेची व्यथा ऐकून घ्याव हीच इच्छा आहे
कोरोणा काळात सर्वांचे दार बंद होती तेव्हा आपल्या व आपल्या कुटुंबाची परवा न करता कंत्राटी नर्सेस सह आरोग्य कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची सेवा दिली. शासनाने उत्तम काम केल्याबद्दल या कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले. 2022 मध्ये उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना दहा वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे शासन सेवेत थेट समायोजन करण्यात यावे असे आदेश दिले
राज्यभरातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 37 दिवस संप आंदोलन करून शासनाने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी ही मागणी केली
शासनाने 14 मार्च 2024 रोजी शासन आदेश काढून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांची सेवा दहा वर्ष व त्यापेक्षा अधिक झालेल्या कर्मचाऱ्यांना मंजूर पदाच्या 30% जागावर समायोजन करण्याचा निर्णय घेऊन आदेश काढण्यात आला
माननीय राज्यपाल महोदय यांनी त्यांच्या अभिभाषनात या कर्मचार्यांना समायोजन करण्याची सूचना दिलेली असून सुद्धा शासन निर्णयाला 15 महिने होऊन सुद्धा समायोजनाचे आदेश निर्गमीत करण्यात आलेले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी यांच्यात तीव्र संताप निर्माण झालेला आहे
आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन च्या वतीने 15 जून 2025 रोजी मागणी दिवस पाडून मा. मुख्यमंत्री यांनी 12 डिसेंबर 12 रोजी दिलेले आश्वासनाकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई आझाद मैदान येथे 16 जून रोजी लक्षवेध आंदोलन करण्यात आलेला आहे
मागील तीन महिन्यापासून आरोग्य सेवेतील या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे
थकीत वेतन द्या नाहीतर विषाची पुडी द्या अशी ही मागणी सरकारकडे करण्यात आलेली आहे
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन आयटक संलग्न कंत्राटी नर्सेस युनियनच्या वतीने करण्यात आले आहे