अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांची खरेदी वाढली, कोट्यावधी औषधांची विक्री
अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर गर्भपातासंबंधातील कायदे आणखी कडक आणि जाचक होतील, अशी भीती तिथल्या महिलांना वाटते आहे. त्यामुळे आता तिथल्या महिलांनी गर्भनिरोधक औषधे खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकेत कोट्यवधी रुपयांची गर्भनिरोधक औषधं विकली गेली.
गर्भनिरोधक औषधं बनवणारी Wisp कंपनीने ५, ६, आणि ७ नोव्हेंबर या तीन दिवसंच्या काळात गर्भनिरोधक औषधांच्या विक्रीतून एक हजार टक्के नफा कमावला आहे. याच दरम्यान गर्भनिरोधक औषधांची खरेदी तब्बल १६५० टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय गर्भपातासंदर्भातील इतर औषधांची विक्रीही ६०० टक्क्यांनी वाढली आहे.