मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज भव्य पुतळ्याची उभारणी

 मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज भव्य पुतळ्याची उभारणी

पोर्ट लुईस, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आफ्रिका खंडातील मॉरिशस या निसर्गरम्य देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी ( दि.२८ एप्रिल) मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुतळ्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे.

मॉरिशसमध्ये एक महाराष्ट्र भवन उभारण्यात आले असून त्याच्या विस्तारासंदर्भातीलसुद्धा काही मागण्या आहेत. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा अपेक्षित आहेत. महाराष्ट्र भवनच्या टप्पा-२ साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ए. गानू यांनी ८ मार्च २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी तसेच महाराष्ट्र भवनाच्या पुढील विस्तारासंबंधी मनोदय व्यक्त केला होता.

मॉरिशसमध्ये सुमारे ७५ हजार मराठी बांधव असून ते पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकण भागातून आले आहेत. त्यांनी आपल्या मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या मराठी बांधवांच्या ५४ संघटना असून या सर्व संघटनांचा मिळून मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन स्थापन करण्यात आले आहे. मॉरिशसमध्ये शिवजयंती, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरे होतात.

SL/KA/SL

26 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *