महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडली. राज्यात १९ मे २०२४ रोजी पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान झाले. आता ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची प्रतिक्षा असताना निवडणूक आयोगाने आज राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांवर कुठे आणि किती मतदान झाले याची माहिती प्रसिद्ध केली आहे. निवडणुकीचा डेटा कोणीही बदलू शकत नाही, असे निवडणूक एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या आकडेवारी नुसार सर्वाधिक म्हणजेच ७१.८८ टक्के मतदान गडचिरोली- चिमूर मतदारसंघात झाले असून सर्वात कमी म्हणजेच ५०.०६ टक्के मतदान मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघात झाले आहे.
मतदारसंघनिहाय टक्केवारी
अहमदनगर- ६६.६१ टक्के, अकोला- ६१.७९ टक्के, अमरावती- ६३.३७ टक्के, औरंगाबाद- ६३.०३ टक्के, भंडारा गोंदिया- ६७.०४ टक्के, बीड- ७०. ९२ टक्के, भिवंडी- ५९.८९ टक्के, बुलढाणा- ६२.०३ टक्के, चंद्रपूर- ६७.५५ टक्के, धुळे – ६०.२१ टक्के,गडचिरोली-चिमूर- ७१.८८ टक्के, हिंगोली – ६३.५४ टक्के, जळगाव- ५८.४७ टक्के, जालना- ६९.१८ टक्के, कल्याण- ५०.१२ टक्के, मुंबई उत्तर- ५७. ०२ टक्के, मुंबई उत्तर मध्य- ५१. ९८ टक्के, मुंबई ईशान्य- ५६.३७ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम- ५४.८४ टक्के, मुंबई दक्षिण- ५०.०६ टक्के, मुंबई दक्षिण मध्य- ५३.६० टक्के.
नागपूर- ५४.३२ टक्के, नांदेड- ६०. ९४ टक्के, नंदुरबार- ७०.६८ टक्के, नाशिक- ६०.७५ टक्के, पालघर- ६३.९१ टक्के, परभणी- ६२.२६ टक्के, पुणे- ५३.५४ टक्के, रामटेक- ६१.०१ टक्के, रावेर- ६४.२८ टक्के, सांगली- ५५.१२ टक्के, सातारा- ५७.३८ टक्के, शिर्डी- ६३.०३ टक्के, शिरूर- ५४.१६ टक्के, सोलापूर- ५३.९१ टक्के, ठाणे- ५२.०९ टक्के, वर्धा- ६४.८५ टक्के, यवतमाळ- वाशीम-६२.८७ टक्के, बारामती- ५३.०८ टक्के, कोल्हापूर- ५६.१८ टक्के, लातूर- ६३.३२ टक्के, मळा- ५४.७२ टक्के, मावळ-५४.८७ टक्के, उस्मानाबाद- ६२.४५ टक्के, रायगड- ५६.७२ टक्के, रत्नागिरी- सिंधुदुर्ग- ५५.६८ टक्के आणि सांगली- ६२.८४ टक्के.
SL/ML/SL
27 May 2024