पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट, ऑडीओ मेसेजने खळबळ

 पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट, ऑडीओ मेसेजने खळबळ

मुंबई,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर एका अज्ञाताकडून ऑडिओ मेसेज पाठवण्यात आले आहेत .मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात एकापाठोपाठ एक अशा अनेक ऑडिओ क्लिप आल्या होत्या. त्यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत असल्याचे म्हटले आहे.

20 आणि 21 तारखेला आलेल्या या मेसेजेसची मुंबई पोलिसांनी या प्रकरणी  तपासादरम्यान ऑडिओ मेसेज करणारा व्यक्ती हा मनोरुग्ण असून तो वर्षभरापासून बेरोजगार आहे. मानसिक आजारामुळं त्याला आधीच्या नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं, अशी माहिती समोर येत आहे. या व्यक्तीला पोलिसांनी अटक ताब्यात घेतलं का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये.

मात्र समोर सध्या समोर आलेल्या माहितीच्या माध्यमातून पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाही .ना याबाबत मुंबई पोलीस सखोल चौकशी करत आहेत

SL/KA/SL
22 Nov 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *