इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरताना विचार करा

 इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरताना विचार करा

मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क):  फ्रिजसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर ते किती उर्जा खर्च करतात याविषयीची माहिती दिलेली असते. ती पाहूनच योग्य उपकरणांची खरेदी करा.

फ्रिज आणि फ्रिझरचं तापमान नियंत्रित राहील याची काळजी घ्या. युरोपियन एन्व्हायर्नमेंट एजन्सीच्या मानकांनुसार फ्रिजचं तापमान 1 ते 4 अंश सेल्सियस आणि फ्रीझरचं तापमान -18 अंश सेल्सियस असावं.

एअर कंडिशनर खोलीचं तापमान कमी करतात, मात्र बाहेरच्या तापमानात थोडी भर टाकतात. अशी उपकरणं सतत सुरू ठेवणं टाळा. भारतात एसीचं तापमान सेट 24-28 डिग्रीच्या रेंजमध्ये असावं, असं तज्ज्ञ सांगतात.

वापरलेल्या जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अशाच कचऱ्यात न टाकता रिसायकलिंगसाठी द्या. तुमच्या शहरात किंवा इंटरनेटवर त्यासाठी काय पर्याय आहेत याची माहिती घ्या.

ML/KA/PGB
Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *