ज्योतिबा मूर्तीवर होणार संवर्धन प्रक्रिया

 ज्योतिबा मूर्तीवर होणार संवर्धन प्रक्रिया

कोल्हापूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर श्री क्षेत्र ज्योतिबा मूर्तीवर ७ ते ११ जुलै या कालावधीत वज्रलेप होणार असून या काळात भाविकांना उत्सवमूर्ती आणि कलश दर्शनावर समाधान मानावं लागणार आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ख्याती असणार्‍या वाडी रत्नागिरी इथल्या श्री क्षेत्र ज्योतिबा मूर्तीवर ७ ते ११ जुलै या कालावधीत मूर्तीसंवर्धन प्रक्रिया म्हणजेच वज्रलेप केला जाणार आहे. या कालावधीत भाविकांना उत्सवमूर्ती आणि कलश दर्शनावर समाधान मानावं लागेल.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रध्दास्थान म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील, पन्हाळा तालुक्यातील, वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र जोतिबा देवस्थान ओळखलं जातं. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला १५ लाखाहून अधिक भाविक तर दर रविवारीसुध्दा हजारो भाविक श्री ज्योतिबाचं मनोभावे दर्शन घेतात. महाराष्ट्राबरोबरच अनेक भाविकांचं हे कुलदैवत आहे.

श्री ज्योतिबा मूर्ती सुस्थितीत रहावी, यासाठी पुरातत्व विभागानं देवस्थान समितीच्या मागणीनुसार पाहणी केली होती. पुरातत्व पुणे विभागानं या संबंधीचा अहवाल तयार करुन, ४ एप्रिल २०२४ रोजी देवस्थान समितीला जोतिबा मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यासंबंधी सूचीत केलंय. या सूचनेच्या आधारे, देवस्थान समितीनं श्री क्षेत्र ज्योतिबा मूर्तीवर ७ ते ११ जुलै या कालावधीत मूर्तीसंवर्धन प्रक्रिया म्हणजेच वज्रलेप करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं या कालावधीत मंदिरातील मुख्य मूर्ती दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्यानं, भाविकांना उत्सवमूर्ती आणि कलश दर्शनावर समाधान मानावं लागेल. Conservation process will be done on Jyotiba idol

ML/ML/PGB
5 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *