हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसला स्पष्ट बहुमत

 हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसला स्पष्ट बहुमत

मुंबई. दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बराच काळ मोठ्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या कॉग्रेस पक्षासाठी आजचा दिवस संजीवनी घेऊन आला आहे.  हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. कॉंग्रेसने विधानसभेच्या ६८ जागांपैकी ४० जागा जिंकत भाजपला पराभवाची धूळ चारली. भाजपला फक्त २५ जागांवर विजय मिळवता आला आहे तर ३ अपक्ष उमेजवार निवडून आले आहेत.  Congress Wins Himachal Pradesh Election 2022

हिमाचल विधानसभेच्या ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात ७५.६ टक्के मतदान झाले होते. या राज्यात प्रत्येक पाच वर्षांत सत्ताबदल होतो. हीच परंपरा यावेळीही कायम राहिली आहे. येथे काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे येथे काँग्रेसच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान आम आदमी पक्षाला या निवडणूकीत खाते उघडता आलेले नाही.

Himachal Pradesh Election

SL/KA/SL

8 Dec. 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *