नागपुरात काँग्रेसची रॅली

नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या 28 डिसेंबर रोजी काँग्रेस स्थापना दिनी नागपुरात काँग्रेस पक्षाची भव्य रॅली आयोजित करण्यात आली असून राज्यभरातील १० लाख काँग्रेस कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य या महारॅलीला उपस्थित राहणार आहेत असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज नागपुरात सांगितले.
ML/KA/SL
15 Dec