काँग्रेस आमदार शिवसेनेत
नागपूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यासमयी आमदार राजू पारवे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल आणि शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव हेदेखील उपस्थित होते.
Shivsena #Nagpur #Ramtek #EknathShinde
Shivsena – शिवसेना Devendra Fadnavis Ajit Pawar Raju Parwe Krupal Balaji Tumane MLA Ashish Jaiswal
ML/ML/SL
24 March 2024