काँग्रेसकडून लोकसभेसाठी ६वी यादी जाहीर

 काँग्रेसकडून लोकसभेसाठी ६वी यादी जाहीर

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली आहे. यात राजस्थानमधील 4 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे आणि तामिळनाडूतून एक उमेदवार आहे. म्हणजेच या यादीत एकूण 5 नावांचा समावेश आहे.

काँग्रेसच्या या यादीत राजस्थानच्या कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रल्हाद गुंजाळ हे यापूर्वी भाजपमध्ये होते. त्यांचा सामना भाजप नेते आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी होणार आहे. प्रल्हाद गुंजाळ यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अजमेरमधून रामचंद्र चौधरी यांना तिकीट देण्यात आले आहे.

यासोबतच राजसमंदमधून सुदर्शन रावत आणि भिलवाडामधून दामोदर गुर्जर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तमिळनाडूतील तिरुनेलवेली येथून अधिवक्ता रॉबर्ट ब्रूस यांना तिकीट देण्यात आले आहे. यासोबतच काँग्रेसने तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारही जाहीर केले आहेत. विलावनकोड जागेवर डॉ. थरहाई कुथबर्ट यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सहाव्या यादीतील उमेदवार

राजस्थान, अजमेर- रामचंद्र चौधरी

राजस्थान, राजसमंद – सुदर्शन रावत

राजस्थान, भिलवाडा – डॉ.दामोदर गुर्जर

राजस्थान, कोटा – प्रल्हाद गुंजाळ

तामिळनाडू, तिरुनेलवेली – रॉबर्ट ब्रुस

काल काँग्रेसने पाचवी यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये तीन उमेदवारांच्या नावांचा समावेश होता.काँग्रेसकडून आतापर्यंत एकूण 6 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये एकूण 190 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

SL/ML/SL

25 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *