काँग्रेस आणि राहूल गांधी सावरकरांबाबत निर्लज्ज पणे खोटे बोलतात

 काँग्रेस आणि राहूल गांधी सावरकरांबाबत निर्लज्ज पणे खोटे बोलतात

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  काँग्रेसचे लोक आणि राहुल गांधी हे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल निर्लज्जपणे खोटे बोलतात , त्यांना योग्य उत्तर द्यावेच लागेल असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.Congress and Rahul Gandhi brazenly tell lies about Savarkar

वारसा विचारांचा या खा राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वा सावरकरांनी स्वातंत्र्या आधी तर कारावास भोगलाच मात्र स्वातंत्र्यानंतर ही त्यांना उपहसाचा कारावास भोगावा लागला. त्यांच्या इतके कारागृहात असताना ज्यांनी अनन्वित अत्याचार भोगले असे भोगणारा एक तरी नेता दाखवा असे आव्हान फडणवीस यांनी यावेळी दिले.

सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाल अपेष्टा सहन केल्या, त्यासोबतच त्यांनी केलेले जाती व्यवस्था निर्मूलनाचे कार्य अत्यंत प्रभावी आहे.असे सांगत, सावरकरांबद्दल बाळासाहेबांना अत्यंत जाज्वल्य अभिमान होता . मात्र ज्या राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल अनुद्गगार काढले त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे पदयात्रेत चालतात याचे अत्यंत वाईट वाटते असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

ML/KA/PGB
16 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *