मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर

 मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त २९ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस (Diwali bonus)जाहीर करण्यात आला आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आज घोषणा केल्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस देण्याची तरतूद नसल्याने दरवर्षी सानुग्रह अनुदान मंजूर केले जाते. हे सानुग्रह अनुदान किती असावे,याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य महापालिकेला देण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांना दीपावली २०२४ निमित्त सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात महानगरपालिकेतील विविध कामगार,कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्त यांच्या चर्चेनंतर दीपावलीसाठी महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे.

अनुदान रक्कम पुढीलप्रमाणेः

  • महानगरपालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये २९,०००/-
  • अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारीः रुपये २९,०००/-
  • महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकः रुपये २९,०००/-
  • माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००/-
  • माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००/-
  • अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००/-
  • अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००/-
  • सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV):भाऊबीज भेट रुपये १२,०००/-
  • बालवाडी शिक्षिका / मदतनीस – भाऊबीज भेट रुपये ०५,०००/-

SL/ML/SL

15 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *