अंबरनाथमधील १२ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेसची कायदेशीर कारवाई
मुंबई, दि. ८ : अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या १२ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सदर प्रकार हा पूर्णपणे बेकायदेशीर असून या सर्व १२ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस पक्ष कायदेशीर कारवाई करणार आहे. स्वतंत्र गट स्थापन करणे किंवा नंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे हे अनैतिक तर आहेच पण असंवैधानिकही आहे. लवकरच या सर्वांना कायदेशीर नोटीसा बजावण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.ML/ML/MS