येणारे दिवस सहकार क्षेत्रासाठी फार चांगले आहेत यशवंतभाई सावंत
मुंबई, दि. १७
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी येणारे भविष्यातील दिवस फार चांगले आहेत. विना सहकार नाही उद्धार या ब्रीद वाक्य प्रमाणे महाराष्ट्र पुढे झेप घेत आहे आणि यापुढेही झेप घेत राहील असे जाहीर प्रतिपादन मुंबई काँग्रेसचे सहकार सेलचे मुंबई अध्यक्ष यशवंत भाई सावंत यांनी सहकार दिनानिमित्त मुंबई काँग्रेस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले केंद्र सरकारमध्ये जे सहकार खाता आहे ते सहकार खातं स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी काँग्रेसच्या काळापासून ते खाते सुरू केले. त्यामुळे आज जे केंद्रामध्ये सहकार खाते सुरू असून त्या खात्याचे मंत्री देखील काँग्रेसमुळे त्या ठिकाणी बसले आहेत. सुशिक्षित तरुणांनी सहकार क्षेत्राकडे वळले पाहिजे. महाराष्ट्रात येणाऱ्या भविष्यात सहकार क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आपले पाय रोवत आहे. ही संधी तरुणांनी ओळखावी आणि सहकार क्षेत्राकडे मोठ्या संख्येने सामील व्हावे.
या कार्यक्रमात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र बावकर, मुंबई काँग्रेस सरकारचे कार्याध्यक्ष धनंजय कुवेस्कर, प्रशासन प्रमुख श्रीनिवास देवरुखकर आणि इतर मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS