पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, डॉक्टर सेल, महिला आघाडीच्या वतीने झाले धरणे आंदोलन
 
					
    पुणे, दि ३१
स्व. डॉ. संपदा मुंडे यांना त्वरीत न्याय मिळवून देण्यासाठी व भाजपाच्या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन.
भाजपाच्या राजवटीत महिलांवर होणारे अन्याय व अत्याचारांची तीव्रता वाढताना दिसत आहे. प्रामुख्याने सत्तेत असणाऱ्या भाजपा व त्यांच्या मित्र पक्षांतील नेत्यांकडून वारंवार महिलांवर अत्याचार झाल्याचे दिसून येते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गुंडाच्या टोळीला पाठीशी घालत डॉ. संपदा मुंडे यांच्यासारख्या पिडीतेला न्याय मिळू नये यासाठी प्रयत्नशिल असल्याचे दिसून येते. संबंधित आरोपींना लवकरात लवकर कठोर दंड देण्यात यावा या मागणीसाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, डॉक्टर सेल व महिला आघाडीच्या वतीने रस्त्यावर उतरून लाल महल येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आपल्या भाषणात शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘बंगालमध्ये एका डॉक्टरची हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशातील भाजप नेते रस्त्यावर उतरले होते, परंतु महाराष्ट्रातील डॉ. संपदा मुंडे प्रकरणामध्ये एकही भाजपा नेता साधा निषेध करताना दिसत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस हे गुंडाचा मोहरक्या म्हणून कार्य करतात का? भाजपचे माजी आमदार रणजीत निंबाळकर व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना कोणतीही चौकशी न करता क्लिन चिट देण्याचे पाप फडवणीसांनी केले आहे. या घटनेचा आम्ही या आंदोलनाद्वारे निषेध करतो व स्व. डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत राहू.’’
यानंतर डॉक्टर सेलचे डॉ. राहुल सावंत म्हणाले की, ‘‘डॉ. संपदा मुंडे या आपले कार्य प्रामाणिकपणे करीत असताना त्यांच्यावरती शासकीय पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दबाव आणून वारंवार त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम केले. या प्रकरणी तातडीने सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी असे न झाल्यास कोणत्याही डॉक्टरी पेशातील व्यक्तीला या देशामध्ये आपले कार्य मुक्तपणे करता येणार नाही.’’
महिला आघाडीच्या प्राची दुधाणे यावेळी म्हणाल्या की, ‘‘महाराष्ट्रातील सरकार आपल्या नेत्यांना पाठिशी घालण्याचे कार्य खुबीने करीत आहे. रणजीत निंबाळकरांना वाचविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संगनमताने विषय भरकटविण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्र्यानी गुन्हेगारांना कोणत्याही तपासाविना क्लिन चिटच देऊन टाकली आहे. रूपाली चाकणकर या स्वत: महिला असून डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे चारित्र्य हनन करून तिच गुन्हेगार असल्याचे निर्लज्जपणे जाहिर केले. या गंभीर प्रकरणात महिलांच्या प्रती असंवेदनशिल व निष्क्रीय असणाऱ्या रूपाली चाकणकर यांना त्वरीत पदमुक्त करावे.
तसेच SIT व CBI यंत्रणेच्या हातात तपास देवून फास्टट्रॅक कोर्टामध्ये डॉ. संपदा मुंडे यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा.’’
यावेळी डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळाच पाही, ‘‘रूपाली चाकणकर आहे कोण? तिला पायताण हाणा दोन’’, ‘‘भाजप सरकारचा धिक्कार असो’’, ‘‘सत्तेच्या खुर्च्या खाली करा खाली करा’’, ‘‘धिक्कार असो धिक्कार असो फडणवीषचा धिक्कार असो’’, ‘‘धिक्कार असो धिक्कार असो रक्तरंजीत धिक्कार असो’’ अशा घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनात शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवतेत महाराष्ट्र प्रदेश काँगेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, नगरसेविका लता राजगुरू, अजित दरेकर, महिला आघाडीच्या प्राची दुधाने, मेहबुब नदाफ, डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ. सुलक्षणा जगताप, डॉ. राहुल सावंत, डॉ. स्नेहल पाडळे, डॉ. नीरज जाधव, डॉ. ऐश्वर्या वाघ कुलकर्णी, अर्चना शहा, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, अनुसया गायकवाड, अनिता धिमधिमे, सिमा सावंत, उषा राजगुरू, सुंदर ओव्हाळ, सुविधा त्रिभुवन, रेखा जैन, ॲड. राजश्री अडसूळ, अंजली सोलापूरे, रोहिणी मल्लाव, सोशल मिडिया अध्यक्ष गुलाम हुसेन खान, राजेंद्र भुतडा, द. स. पोळेकर, अनिल पवार, अक्षय माने, रमेश सोनकांबळे, विशाल जाधव, अविनाश अडसूळ, फिरोज शेख, सचिन भोसले, श्री. काकडे, राज जाधव, सुरेश नांगरे, देवीदास लोणकर, भगवान कडू, संजय अगरवाल आदि उपस्थित होते.KK/ML/MS
 
                             
                                     
                                    